Other 
शहिदांच्या स्मारकासाठी एक मूठ माती गोळा करणारा अवलिया...श्री.उमेश जाधव यांच्याशी भेट

  February 02,2023

  

शहिदांच्या स्मारकासाठी एक मूठ माती गोळा करणारा अवलिया...श्री.उमेश जाधव
शहिद सैनिकांच्या घरी जाऊन तिथून एक मूठ माती जमा करत देशभर फिरतो आहे. पुढील प्रवासासाठी निघत असताना.. श्री.जाधव सातारा मध्ये शिवतीर्थ वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी आले होते.  त्यावेळी सातारा हील सायक्लोथॉन, कट्टा ग्रुप यांच्या वतीने त्यानेच स्वागत करण्यात आले व सातारा कंदी पेढे देऊन त्यांना पुढील वाटालीसाठी शुभेच्या देण्यात आल्या.. 

पुलवामा येथे शहीद  झालेल्या जवानांच्या बातम्या टीव्ही वर झळकत होत्या. या शहिदांपैकी कोणी माझा कुटुंबीय असता तर या विचाराने त्यांच्या  मनाची घालमेल सुरु होती. ते खूप बेचेन  झाले. आपल्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या या जवानांसाठी काहीतरी केले पाहिजे हे विचार चक्र त्यांच्या मनात सुरु झाले. शेवटी त्यांनी ठरवले देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येक शहिदाच्या  घरी जायचे  तिथून एक मूठ माती घ्यायची. देशाच्या कानाकोपऱ्यातून गोळा केलेल्या या मातीतून शहीद जवानांचे स्मारक उभारायचे या ध्येयाने पछाडलेले बंगळुरूचे उमेश जाधव. संगीताचे  शिक्षक असलेले उमेश जाधव मूळचे औरंगाबादचे. सुमारे 10 वर्षांपूर्वी ते बंगळुरू येथे स्थायिक झाले. जाधव  यांनी भारतीय लष्कराच्या परवानगीने 9 एप्रिल 2019 रोजी बंगळुरूहून त्यांच्या प्रवासाला सुरवात केली. बंगळुरूचे सीआरपीएफचे प्रमुख सानंद कमल यांनी फ्लॅगऑफ करून उमेश यांच्या प्रवासाची सुरवात करून दिली. पहिल्या महायुद्धात शाहिद झालेल्या भारतीय सैनिकांपासून आतापर्यंत देशासाठी जीव दिलेल्या प्रत्येक शाहिदच्या घरी जायचे आणि त्यांच्या घरातील एक मूठ माती घ्यायची असा निश्चय त्यांनी केला आहे. या गोळा केलेल्या मातीपासून ते पुलवामा येथे शहीद स्मारक उभारणार आहेत. जाधव यांनी आतापर्यंत 77 हजार कि. मी. चा प्रवास पूर्ण केला आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि लड्डाख हे तीन भाग वगळता देशातील प्रत्येक राज्याचा दौरा जाधव यांनी केला आहे. पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले ‘ मैसूर लान्सर ‘ रेजिमेंट च्या शहिदांच्या घरूनही जाधव यांनी माती घेतली आहे. पुलवामा येथील सर्व 40 शहिदांच्या घरची माती त्यांनी लष्कराकडे सूपूर्तही केली आहे. 26/11 च्या आंतकी हल्यात  शहीद झालेले मेजर उन्नीकृष्णन यांच्या घरूनही त्यांनी माती घेतली आहे.   त्यांचा हा प्रवास एका वर्षात 9 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होता. पण लॉकडाऊन मुळे तसे होऊ शकले नाही. पुढच्या महिन्यात 9 एप्रिलला त्यांचा हा प्रवास पूर्ण होणार आहे.
हा तर फक्त पहिला टप्पा : उमेश जाधव
शहिदांच्या स्मारकासाठी चालवलेल्या या उपक्रमाविषयी बोलताना उमेश जाधव म्हणाले की, “देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांची संख्या खूप मोठी आहे. माझ्या आताच्या प्रवासात सर्व शहिदांच्या घरी जाणे शक्य झाले नाही. हा तर पहिलाच टप्पा आहे. हा प्रवास अविरतपणे असाच सुरु राहणार आहे. मी गोळा केलेली माती लष्कराच्या स्वाधिन करणार आहे.  त्यांच्या प्रोटोकॉलनुसार ते स्मारकाचे काम पूर्ण करतील. माझ्या या भारत दौऱ्याला आणि उपक्रमाला लष्कराची संमती आहे.”
या वेळी श्री.अलंकार जाधव, श्री संकेत परमने, श्री.धनंजय खोले, श्री.विशाल जगदाळे, श्री. रोहित कटके, श्री.ऋषिकेश कडेकर उपस्थित होते.