Other 
जनता अर्बन को-ऑप बँक, वाई यांची 9 ऑगस्ट-क्रांतिदिनी डिजिटल क्रांती

Wai  August 10,2022

  

जनतेची ..... जनतेसाठी........ जनते बरोबर ....... सदैव असणारी ........असे ब्रीदवाक्य सदैव आमलात आणणारी सोनगीरवाडी, वाई येथे मुख्य कार्यालय असणारी ` जनता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ` यांचे वतीने ` बी डिजिटल - गो डिजिटल ` असे धोरण राबवण्यासाठी आज दि 9 ऑगस्ट 22 या क्रांतिदिनी ` डिजिटल क्रांती ` केली गेली आहे. आज त्यांच्या अत्याधुनिक वेबसाईट व डिजिटल " रुहा" व्हीकार्ड चे अनावरण बँकेचे संस्थापक व चेअरमन श्री सुरेशराव कोरडे व सर्व सन्माननीय संचालक मंडळ,  या www.jucbwai.com या वेबसाईट व डिजिटल व्हीकार्ड चे संकल्पक व जे ए सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड चे संस्थापक व सी ई ओ श्री अलंकार जाधव व डिजिपेडल या संस्थेचे प्रमुख श्री गौरव निकम यांच्या प्रमुख उपस्तिथीत संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना माननीय चेअरमन श्री सुरेशराव कोरडे यांनी सध्याच्या डिजिटल युगात आपल्या बँकेने केलेल्या ` डिजिटल क्रांती ` विषयी माहिती देऊन सर्वसामान्य गरजू ग्राहकांच्या दृष्टीने बँकेची वेबसाईट व डिजिटल व्हीकार्ड चे विविध फायदे नमूद केले. रुहा प्लॅटफॉर्म चे जनक श्री अलंकार जाधव यांनी जनता अर्बन बँकेच्या ` गो डिजिटल ` या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत  करून बँकेने संचालक मंडळ व बँक आॅफीसर यांना रुहा व्हीकार्ड दिले यांचे बँकेला तसेच  विविध ग्राहकांसाठी असणारे  फायदे, तसेच व्हीकार्ड द्वारे तयार होणाऱ्या QR कोड द्वारे रुहा व्हीकार्ड चे शेअरिंग व उपलब्ध होणारे विविध पेमेंट गेटवेज व त्याद्वारे होणारे पेमेंट चे ट्रांझाकशन संदर्भात माहिती दिली. या सर्व उपक्रमात  जे यु सि बी बँकेने वाई सारख्या ग्रामीण भागात मुख्य कार्यालय असून देखील हे निर्णय घेतल्याबद्दल मा चेअरमन सुरेशराव कोरडे साहेब व सर्व संचालक मंडळ तसेच या उपक्रमात बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल डिजिपेडल चे श्री गौरव निकम यांचे आभार मानले. यापुढील काळात देखील बँकेच्या डिजिटल कामकाजात जे ए सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड चे नेहमीच  संपूर्ण सहकार्य दिले जाईल असे श्री अलंकार जाधव यांनी आश्वासन दिले .