Other 
दास ग्रुपच्या सर्व ५०० कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या १०० अधिकारी वर्गाच्या रुहा व्हीकार्ड चे वितरण

  September 28,2022

  

पुणे : दि 28 रोजी हॉटेल ऑरचिड पुणे येथे दास ग्रुप ऑफ कंपनीज च्या वतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वन डे ट्रेनिंग प्रोग्रॅम, एकूण ५०० कर्मचार्यांपैकी पहिल्या लॉट मधील १०० अधिकारी वर्गाचे “रुहा व्हीकार्ड” वितरण याच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी दास ग्रुप चे चेअरमन व CMD, मा श्री विकास जाधव, मा श्री शशिकांत भंडारे , MD, डिजिपेडल चे प्रमुख श्री गौरव निकम , मोटीवेशनल स्पीकर मा श्री दत्तात्रय जांभळे , व j a सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड चे Founder व CEO श्री अलंकार जाधव तसेच सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्तिथ होते . मा श्री विकास जाधव व मा श्री शशिकांत भंडारे यांनी दास ग्रुपच्या वतीने श्री गौरव निकम यांचे सॉफ्टवेअर सोल्युशन्स व श्री अलंकार जाधव यांचे “रुहा व्हीकार्ड” च्या निर्मितीसाठी कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा श्री अलंकार जाधव यांनी रुहा व्हीकार्ड चे विविध डेमो देऊन दास ग्रुप च्या सुर्या गॅस सेफ्टी डिव्हाईस साठी काम करणारे तसेच इतर प्रोजेक्ट मध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कशाप्रकारे “रुहा व्हीकार्ड” चा उपयोग करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच “रुहा व्हीकार्ड” द्वारे उपलब्ध होणाऱ्या कॉन्टियुअस कम्युनिकेशन व सेन्टरलाईज मॅनेजमेंट अशा सुविधांचा उपयोग करून बिझनेस प्रोस्पेकटिंग कशा प्रकारे होऊ शकते याबाबत माहिती सांगितली. याच कार्यक्रमात एकूण ५०० कर्मचार्यांपैकी १०० अधिकारी कर्मचाऱ्यांची “रुहा व्हीकार्ड” JA सोल्युशन्स च्या टेक्निकल टीमने बनवून त्याचे वितरण करण्यात आले. दास ग्रुपच्या मॅनेजमेंट ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी रुहा व्हीकार्ड बनवून घ्यायचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व मॅनेजमेंट व कर्मचारी यांचे अभिनंदन मा श्री अलंकार जाधव यांनी केले व भविष्यकाळात डिजिटल सोल्युशन्स बाबत j a सोल्युशन्स कायम दास ग्रुप बरोबर असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.