भवताल च्या वाटचालीत रुहा प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या वेबसाईट चे महत्वपूर्ण योगदान

    Posted On November 10,2022

      
    भवताल” या एन जी ओ द्वारे सर्वसामान्य पर्यावरण प्रेमींना आपल्या सभोवताल च्या पर्यावरणाची सजगपणे ओळख व्हावी व त्याद्वारे त्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमात योगदान द्यावे यासाठी प्रयत्नशील आहे. भवताल द्वारे पर्यावरणासाठी वाहिलेले मासिक काढले जाते तसेच पर्यावरण संबंधित अभ्यासक्रम राबवणे, गायडेड इकोटूर्स चे आयोजन करणे, पर्यावरणाची ओळख करून देणारे ब्लॉग्ज लेखन आशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्वच उपक्रमांना महाराष्ट्रातील हजारो जागरूक पर्यावरण प्रेमींचा अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.